बुधवार, १८ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

ठरलं तर मग: सायली दोन्ही बाळांना घेऊन घरी; घरात वाद

ठरलं तर मगच्या १८ नोव्हेंबरच्या भागात सायली आणि अर्जुन प्रियाच्या बाळालाही घरी घेऊन येतात. कस्टडीचा प्रश्न सुटला असला तरी सुभेदारांच्या घरात वाद सुरू होतो.

ठरलं तर मग: सायली दोन्ही बाळांना घेऊन घरी; घरात वाद

ठरलं तर मग या मालिकेच्या १८ नोव्हेंबर २०२६ च्या भागात सायली आणि अर्जुन घरी परततात तेव्हा सुभेदारांच्या घरात मोठा गोंधळ उडतो. ते येताना केवळ आपल्या बाळासोबत नसतात, तर त्यांच्यासोबत आणखी एक बाळही असते. हे दुसरे बाळ प्रियाचे असते. हे पाहून घरातल्या सगळ्यांनाच धक्का बसतो आणि घरात भांडणांना सुरुवात होते.

लक्ष्मीपूजनाच्या तयारीत घडलेला प्रसंग

भागाच्या सुरुवातीला अस्मिता लक्ष्मीपूजनाची तयारी करत असते. तेव्हा श्वेता मुद्दामून तिचा बदला घेण्यासाठी तिच्या अंगावर पडण्याचे नाटक करते. अस्मिताच्या बाजूलाच पणत्या पेटलेल्या असतात, त्यामुळे अस्मिताचा तोल जाऊन ती भाजली जाणार असते. पण वेळीच विमल तिथे येते आणि श्वेताला सावरते, त्यामुळे अस्मिता थोडक्यात वाचते. श्वेता मनातल्या मनात विमलला ही का तडमडली असे म्हणत असते. त्यानंतर सगळेजण लक्ष्मीपूजनाची तयारी करत असतात तेव्हा सगळ्यांना सायली आणि अर्जुनची आठवण येते. इतक्यात अस्मिता बोलते की आता त्यांची आठवण काढायची गरज नाही, कारण ते घरी आले आहेत. हे ऐकून सर्वांना आनंद होतो आणि सर्व त्यांच्या स्वागतासाठी दाराकडे जातात.

सायली आणि अर्जुन जसे दारात येतात तेव्हा सर्वांना धक्का बसतो, कारण ते येताना केवळ आपल्या बाळासोबत नसतात तर त्यांच्यासोबत आणखी एक बाळही असते. अश्विनला याचा अंदाज आलेला असतो, त्यामुळे तो तिथेच चिडायला सुरुवात करतो. सगळेजण त्याला विचारतात की तू असा का चिडतोयस आणि तुला माहित आहे का हे बाळ कोणाचे आहे. सायली आणि अर्जुनलाही ते सारखा प्रश्न विचारत असतात. तेव्हा फ्लॅशबॅकमध्ये काय घडले ते दाखवले जाते.

कस्टडीचा फॉर्म आणि घरातला वाद

सायली जेव्हा प्रियाच्या बाळाबाबत विचार करत होती तेव्हा अर्जुन तिला सुरुवातीला नकारच देत असतो. पण सायली अर्जुनला समजावून सांगते की प्रियाने केलेली चूक तिच्या बाळाने का भोगायची. आपले बाळ जितके निरागस आहे तितकेच ते बाळही आहे. त्या बाळालाही समाजात सर्वकाही चांगले मिळण्याचा अधिकार आहे. जर आपल्यामुळे ते होत असेल तर आपण का नाही द्यायचे, असे ती म्हणते. अर्जुनला हळूहळू सायलीचे सर्व म्हणणे पटते. तो प्रियाच्या बाळाची जबाबदारी घ्यायला तयार होतो. सुभेदारांच्या घरी बाळाच्या कस्टडीबाबत अश्विनला नोटीस गेलेली असते. अश्विन लगेचच अर्जुनला फोन करून त्या बाळाच्या कस्टडीला नकार दे असे सांगतो. पण आपण अश्विनला सांभाळून घेऊ असा त्यांना विश्वास असतो. सायलीने अनाथ असल्याचे दुःख भोगलेले असते, त्यामुळे आणखी एका बाळाला ते सहन करावे लागू नये यासाठी ती प्रयत्न करत असते.

प्रिया हॉस्पिटलमध्ये त्या बाळाला झिडकारत होती. तेव्हा आपण बाळाला स्वीकाराला नकार दिलेला, पण आता जर तिला समजले की आपण बाळाची कस्टडी घ्यायला तयार आहोत तर ती मुद्दामून नखरे करणार. आपल्याला तिच्या नकळत हे सगळे करावे लागेल असे सायली अर्जुनला सांगते. तेव्हा अर्जुन हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांची मदत घेतो. डॉक्टर प्रियाला सांगतात की तुझ्या बाळाची जबाबदारी एका संस्थेने घेतली आहे. प्रिया बेफिकीरपणे बोलत असते की तिला कुठल्या आश्रमात नेऊन टाकणार आहात मला त्याचा काही फरक पडत नाही, पण तरीही मला समजले पाहिजे. पण डॉक्टर तिला त्याबद्दल काहीही सांगत नाहीत. आश्रमात जाणार एवढेच त्या तिला सांगतात. प्रियाला वाटत असते की सायलीचे बाळ आता कुठल्यातरी आश्रमात जाऊन पडणार आणि आपले बाळ सुभेदारांच्या ऐश्वर्यात लोळणार, त्यामुळे ती खूप खुश असते. जेव्हा डॉक्टर बाहेर येऊन अर्जुनला प्रियाने सही केलेला फॉर्म देतात तेव्हा तो खूप खुश होतो. इथे फ्लॅशबॅक संपलेला दाखवला जातो.

सायली आणि अर्जुन असे का वागले याबाबत सतत सर्वजण जाब विचारत असतात. अश्विन तर इतका भयंकर चिडलेला असतो की तो म्हणतो की तुम्हाला हे बाळ घरी आणण्यापूर्वी माझा जरा सुद्धा विचार करावासा वाटला नाही का. पूर्णा आजी पण म्हणते की तुम्ही घरच्यांना साधा विचारायची तसदीसुद्धा घेतली नाही. यावेळी प्रतिमा सुद्धा सायलीवर चिडलेली असते. घरात होणारी भांडणे पाहून श्वेताला आनंद होतो आणि ती लगेच याबाबत प्रियाला सांगायला जाते. श्वेता प्रियाला फोन करून सांगते की तुला वाटत होते सायलीचे बाळ आश्रमात जाऊन पडले आहे, पण तुझ्याशी डॉक्टर खोटे बोलले, कारण सायली येताना तिच्या आणि तुझ्या अशा दोन्ही बाळांना घेऊन आली आहे. आपला प्लॅन फ्लॉप झाला हे ऐकून प्रिया चिडते, पण नंतर ती थोडा विचार करते की यामुळे जर सुभेदारांच्या घरात भांडणे होत असतील तर आता सुभेदार मुद्दामून माझ्या बाळाचे लाड करणार आणि त्या सायलीच्या बाळाकडे बघून सुद्धा घेणार नाहीत, त्यामुळे इथे हरून सुद्धा मी जिंकली आहे.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance