तुळशीचे झाड जवळपास प्रत्येकाच्या घरात असते. मात्र योग्य काळजी घेऊनही अनेकदा तुळशीच्या पानांवर काळी किड दिसू लागते. पानांच्या मागील बाजूला पांढरी बुरशी जमा होते आणि हळूहळू पाने गळून झाड सुकायला लागते.
तांदूळ धुतलेले पाणी फेकू नका
अशा वेळी महागडी खते किंवा रासायनिक औषधे वापरण्याऐवजी घरातील एका साध्या पदार्थाचा उपयोग करता येऊ शकतो. तांदूळ धुतलेले पाणी फेकून न देता त्यापासून नैसर्गिक खत आणि फवारणीसाठी द्रावण तयार करता येते.
झाडाच्या वाढीला मदत
या नैसर्गिक द्रावणामुळे झाडाच्या वाढीस मदत होते. तसेच कीड आणि बुरशीच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठीही याचा वापर करता येतो. घरातील उपलब्ध साहित्यापासून तयार होणारे हे द्रावण तुळशीच्या झाडाची काळजी घेण्यासाठी उपयुक्त ठरते.
Leave a Reply