राजस्थानमधील कोटा शहरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने सर्वांनाच हादरवले आहे. घराच्या छतावर कपडे वाळत घालत असलेल्या २८ वर्षीय महिलेवर माकडाने अचानक हल्ला केला आणि या घटनेत तिचा मृत्यू झाला.
छतावर अचानक माकडाची उडी
महिला छतावर कपडे वाळत घालत असताना माकडाने तिच्यावर उडी मारली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे महिला प्रचंड घाबरली. भीती आणि धक्क्यामुळे तिला हृदयविकाराचा झटका आला आणि जागीच तिचा मृत्यू झाला.
परिसरात खळबळ
या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरात माकडांच्या वावरामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. या घटनेने माकडांच्या उपद्रवाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Leave a Reply