स्वयंपाकघरात फरशीवर ठेवलेल्या गॅस सिलिंडरच्या खालच्या भागात मोकळी जागा असते. याच जागेत झुरळं आपलं घर बनवतात. ही बाब अनेकदा लक्षात येत नाही आणि दुर्लक्ष केल्यास आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.
झुरळं तिथेच का जमतात?
स्वयंपाकघरात अन्न शिजवण्याच्या सामानाबरोबरच अनेकजण वेगवेगळं सामान ठेवतात. त्यामुळे स्वयंपाकघरात अडचण निर्माण होते आणि छोट्या कीटकांना लपण्यासाठी जागा मिळते. झुरळ हा असा कीटक आहे जो अशा ठिकाणी हमखास घर बनवतो. सिलिंडर ठेवलेल्या जागेची वेळोवेळी सफाई न केल्यास तिथे झुरळं घर तयार करू शकतात आणि पुढच्याच काही दिवसांत त्यांची संख्या वाढते.
अन्नावर फिरल्यास आजारांचा धोका
ही झुरळं आपण तयार करत असलेल्या अन्नावर फिरायला लागतात. त्यामुळे छोटे-मोठे आजार होण्याची शक्यता निर्माण होते. काही वेळा थेट रुग्णालयात जावे लागू शकते. त्यामुळे ही बाब हलक्यात घेऊ नये.
काय काळजी घ्यावी?
गॅस सिलिंडर ठेवलेल्या जागेची नियमित सफाई करा. स्वयंपाकघरातील कोपरे आणि अडगळीची जागाही स्वच्छ ठेवा. यामुळे घरात झुरळं होणार नाहीत आणि कुटुंबाचे आरोग्यही सुरक्षित राहील.
Leave a Reply