महाराष्ट्र खो-खो असोसिएशन आणि अहिल्यानगर जिल्हा खो-खो असोसिएशनच्या वतीने २०२६-२०२७ या वर्षाची ६२ वी पुरुष आणि महिला राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा २८ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जिल्हा पुरुष आणि महिला खो-खो संघाची निवड चाचणी २० नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता शिरपूर येथील आर. सी. पटेल संकुलाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या मैदानावर होणार आहे.
चाचणीतून निवडलेला संघ राज्य अजिंक्यपद स्पर्धेत धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. संघ निवड समितीमध्ये गुरुदत्त चव्हाण, हेमंत भदाणे आणि गौरव सपकाळे यांचा समावेश आहे.
चाचणीसाठी आवश्यक कागदपत्रे
सहभागी इच्छुक संघास अधिकृत प्रवेश अर्ज, संलग्नता आणि प्रवेश शुल्क, आधारकार्ड, जन्मदाखला, दहावी आणि बारावीचे बोर्ड प्रमाणपत्र जमा करणे अनिवार्य आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त संलग्न संघ, क्रीडा मंडळ, शाळा-महाविद्यालये आणि खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
अधिक माहितीसाठी प्रा. हेमंत भदाणे, प्रा. करण शिंदे आणि सागर माळी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पंढरीनाथ बडगुजर आणि अनिल संचेती यांनी केले आहे.
Leave a Reply