घरी जेवण बनवल्यानंतर ते खाणे आणि उरलेले अन्न फ्रीजमध्ये ठेवणे ही अनेकांच्या घरातील रोजची सवय आहे. पण जेवण शिल्लक राहिल्यानंतर ते गरम असतानाच फ्रीजमध्ये ठेवता का? जर तुम्हीही असे करत असाल, तर ही सवय बदलण्याची गरज आहे.
गरम अन्न लगेच फ्रीजमध्ये का ठेवू नये?
जेवणातून गरम वाफ येत असेल, ते खूप गरम असेल किंवा भांड्याला हात लावणेही कठीण जात असेल, तर असे जेवण लगेच फ्रीजमध्ये ठेवणे योग्य नाही. गरम जेवण लगेच फ्रीजमध्ये ठेवल्यास काय होते, याबद्दल माहिती असणे गरजेचे आहे.
अन्न ठेवण्याची योग्य पद्धत
याचा अर्थ जेवण अनेक तास बाहेर ठेवावे, असाही होत नाही. जेवण कमी वेळात योग्य पद्धतीने थंड करून फ्रीजमध्ये ठेवणे गरजेचे आहे. अन्न सुरक्षित ठेवण्यासाठी ते जास्त वेळ अशा तापमानात राहणार नाही, याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
Leave a Reply