दिवाळीच्या मुहूर्तावर अनेकांनी नवीन स्मार्टफोन खरेदी केले असतील. पण जर तुम्ही आता नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल, तर हा तुमच्यासाठी मोठा धक्का असणार आहे. मोबाईल फोनच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे.
४० हून अधिक मॉडेल्सवर वाढ
सॅमसंग आणि शाओमी या आघाडीच्या स्मार्टफोन कंपन्यांनी त्यांच्या अनेक लोकप्रिय मालिकांच्या किंमती वाढवल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या दोन कंपन्यांनी ४० हून अधिक स्मार्टफोन मॉडेल्सच्या किंमती वाढवल्या आहेत. वेगवेगळ्या मॉडेल्सवर तब्बल ४,००० ते ५,००० रुपयांपर्यंतची वाढ करण्यात आली आहे.
ग्राहकांवर आर्थिक भार
किंमती वाढल्यामुळे ग्राहकांना आता नवीन फोन खरेदी करण्यासाठी अधिक खर्च करावा लागणार आहे. दिवाळीनंतर फोन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांच्या खिशावर या वाढीचा थेट परिणाम होणार आहे.
Leave a Reply