मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

ऋषिकेशजवळ बस दरीत कोसळली, ८ ठार; १९ जखमी

ऋषिकेशजवळ मंगळवारी सकाळी प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून कोसळून खोल दरीत पडली. या भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून १९ जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.

ऋषिकेशजवळ बस दरीत कोसळली, ८ ठार; १९ जखमी

उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे मंगळवारी सकाळी भीषण रस्ते अपघात झाला. प्रवाशांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली आणि खोल दरीत पडली. या भीषण अपघातामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला. ही घटना बद्रीनाथ महामार्गावरील गुलार बाजारजवळ घडली. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये ३० ते ३५ जण प्रवास करत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, मुनिकिरेती पोलिस ठाण्याच्या हद्दीत हरिद्वारहून चमोलीकडे जाणारी विश्वनाथ सेवेची बस आज सकाळी ऋषिकेशजवळील गुलेर परिसरात पुलावरून कोसळून खोल दरीत पडली. बस पाण्यात बुडाली. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये बसचा चुराडा झाला.

पोलिस आणि एसडीआरएफचे बचावकार्य

अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि एसडीआरएफची पथके घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले. या अपघातामध्ये आतापर्यंत १९ जखमी प्रवाशांना वाचवून एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. प्रशासन, पोलिस आणि एसडीआरएफचे जवान घटनास्थळी बचावकार्य करत आहेत.

एसडीआरएफच्या अधिकाऱ्याने सांगितले की, अपघाताची माहिती मिळताच ब्यासी आणि धलवाला चौक्यांमधील पथके तात्काळ घटनास्थळी रवाना झाली. घटनास्थळी दाखल होताच त्यांनी तात्काळ मदत आणि बचावकार्य केले. काही प्रवासी बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे. सध्या घटनास्थळी एसडीआरएफ पथके बचावकार्य करत आहेत.

रुद्रप्रयागमध्ये आणखी एक अपघात

उत्तराखंडमधील आणखी एका रस्ते अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला. रुद्रप्रयागमध्ये एका कारला अपघात झाला. हे सर्वजण एका लग्नाहून परत येत होते. सोमवारी रात्री ९ वाजता हे सर्वजण लग्न सोहळ्यावरून परत येत असताना ही घटना घडली. कार अनियंत्रित होत दरीत कोसळली. या कारमधून १० जण प्रवास करत होते. यातील चौघांचा मृत्यू झाला. तर जखमी झालेल्या सहा जणांवर उपचार सुरू आहेत. चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर श्रीनगर येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance