मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

अक्कलकोटमध्ये एफडीएची धडक कारवाई: ८५० किलो पेढे जप्त

अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर परिसरात एफडीएने कारवाई केली. १२ दुकानांची तपासणी करून अडीच लाखांचे ८५० किलो पेढे जप्त करण्यात आले; चार आस्थापनांना बंदचे आदेश दिले.

अक्कलकोटमध्ये एफडीएची धडक कारवाई: ८५० किलो पेढे जप्त

राज्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात बेधडक कारवाई सुरू आहे. मुंढे करत असलेल्या कारवायांमुळे अनेक हॉटेलमध्ये सुधारणा झाली आहे. आता मुंढे यांच्या पथकानं अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिर परिसरात मोठी कारवाई केली आहे.

अडीच लाखांचे पेढे जप्त

सोलापूर अन्न आणि औषध प्रशासनाच्या झोन १ पथकानं अक्कलकोट येथील पेढा उत्पादक आणि विक्रेत्यांवर छापा टाकला. या कारवाईत मंदिर परिसरातील अडीच लाख रुपये किमतीचे साडेआठशे किलो पेढे जप्त करण्यात आले. मंदिर परिसरातील पेढा आणि प्रसाद विक्री करणाऱ्या १२ दुकानांची तपासणी करण्यात आली आणि त्रुटी आढळल्यानंतर विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.

परवाना निलंबित, चार आस्थापने बंद

या कारवाईमुळे मुख्य पुरवठादार असलेल्या व्यावसायिकाचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला आहे. त्यासोबतच चार आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अक्कलकोट येथील मुख्य मिठाई पुरवठादार रंगोली स्वीट मार्ट येथे एफडीएने छापा टाकला होता.

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance