पुणे शहरातील वाढीव पाणी कपातीचा निर्णय सध्या लांबणीवर पडला आहे. पाटबंधारे विभागासोबत चर्चा झाल्यानंतरच याबाबत अंमलबजावणी होणार आहे. या निर्णयाबाबत महापौर पाटबंधारे विभागाला पत्र पाठवणार आहेत.
तेरा टीएमसी पाण्याचा कोटा
पुणे शहरासाठी पाटबंधारे विभागाने १३ टीएमसी पाणी कोटा मंजूर केला आहे. मात्र त्यावर महापालिकेसोबत चर्चा केली जावी, असे पत्र पाटबंधारे विभागाला पाठवण्यात येणार आहे. या चर्चेनंतरच पाणी कपात वाढवण्यासंदर्भात निर्णय होणार आहे.
खडकवासला धरणातील पाणीसाठा कमी
पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात गेल्यावर्षीपेक्षा सहा टीएमसी पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे भविष्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, यवतमाळमध्ये विहीर खोलीकरण आणि बोअरवेल खोदकाम करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
Leave a Reply