नागपूरहून उमरेड-पवनीकडे जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्स बसला सायंकाळी सुमारे ४ वाजता चांपा परिसरातील इंडियन पेट्रोल पंपाजवळ अचानक आग लागली. या घटनेत बसच्या आतील ५० हून अधिक प्रवाशांना मोठा धोका निर्माण झाला होता.
चालकाच्या प्रसंगावधानाने जीव वाचले
आगीचा धूर आणि ज्वाला पाहताच चालकाने प्रसंगावधान राखून तत्काळ बस थांबवली. त्याने बसला बाजूला घेतलं आणि प्रवाशांना बाहेर येण्यासाठी मदत केली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आणि जीवितहानी टळली.
आगीचं कारण अद्याप स्पष्ट नाही
प्राथमिक माहितीनुसार, बस नागपूरहून उमरेड-पवनी मार्गावरून प्रवास करत असताना चांपा येथील पेट्रोल पंपाजवळ आग लागली. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
Leave a Reply