आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये त्यांनी पती-पत्नीच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात.
संसाररूपी रथाची दोन चाके
पती-पत्नीचे नाते कसे असावे, याबद्दल सांगताना चाणक्य म्हणतात की पती-पत्नी ही एकाच रथाची दोन चाके आहेत. जोपर्यंत ही दोन्ही चाके समान गतीने धावत आहेत, तोपर्यंत हा संसाररूपी रथ धावत राहतो. परंतु त्यातील एका चाकाने जरी साथ सोडली किंवा एक चाक जरी मागे पडले, तर मात्र संसार सुरळीत होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे समाजात असे देखील काही लोक असतात, ज्यांच्यापासून पती-पत्नीने कायम सावध राहण्याची गरज असते. एखादी छोटीशी चूक देखील संसार उद्ध्वस्त करू शकते.
वाईट सवयी असलेले लोक
चाणक्य म्हणतात की समाजात व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात. काही लोक चांगले असतात, जे आपल्या असण्याने इतरांच्या आयुष्यात देखील आनंद पेरतात. अशा लोकांच्या संगतीमध्ये असाल तर संसार सुखाचा होतो. परंतु समाजात असे देखील काही लोक असतात, ज्यांना वाईट सवयी असतात. अशा लोकांच्या संपर्कात आलात तर मात्र आयुष्य देखील उद्ध्वस्त होऊ शकते. त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी सावध राहावे, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. त्याचप्रमाणे आपला जोडीदार नेमका कोणाच्या संगतीमध्ये आहे, यावर देखील लक्ष असले पाहिजे, तरच संसार सुखाचा होऊ शकतो, असे चाणक्य म्हणतात.
चुगल्या करणारे लोक
चाणक्य म्हणतात की चुगल्या करणाऱ्या लोकांपासून तर नेहमी सावध राहिले पाहिजे, कारण असे लोक तुम्हाला काही तरी वेगळेच सांगतात आणि तुमच्या पतीला किंवा पत्नीला आणखी काही वेगळेच सांगणार. अशा लोकांच्या संगतीमुळे घरात वारंवार भांडणे होऊ शकतात. यामुळे संसार धोक्यात येऊ शकतो, त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी सावध राहावे, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
वरील माहिती उपलब्ध स्रोतांवरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल कुठलाही दावा केला जात नाही.
Leave a Reply