जळगाव : महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या महामंडळाच्या ३७ व्या मुले-मुली राज्य अजिंक्यपद आट्यापाट्या क्रीडा स्पर्धेत जळगाव जिल्ह्याच्या मुलांच्या संघाने सलग सहाव्यांदा विजेतेपद मिळवले आहे. अंतिम सामन्यात धाराशिवच्या संघावर २ विरुद्ध ० सेट असा एकतर्फी विजय नोंदवत जळगावच्या संघाने आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले.
ही स्पर्धा रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील बोरली पंचतन येथे पार पडली. जळगावच्या संघाने आक्रमण आणि संरक्षण या दोन्ही आघाड्यांवर चतुरस्र खेळ करत उत्कृष्ट कामगिरी बजावली. अंतिम सामन्यात धाराशिवचा पराभव करत संघाने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. जळगाव संघाचा साहिल बिडकर हा स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू ठरला.
मुलींचाही तिसरा क्रमांक
जळगावच्या मुलींच्या संघानेही या स्पर्धेत तिसरे स्थान मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली आणि जिल्ह्याचे नाव उंचावले. विजेत्या खेळाडूंचे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात सर्वत्र कौतुक होत आहे.
विजेत्या संघाचा सन्मान
विजेत्या संघातील खेळाडूंना माजी खासदार धैर्यशील पाटील, श्रीवर्धन पंचायत समितीचे सभापती सचिन कीर, सुकुमार तोंडलेकर, मंदार तोडणकर, नंदू पाटील, उत्तम दिवेकर, गणेश पाटील, सुजित पाटील, रूपेश नांदेडकर, अक्षय तोडणकर आणि अभिजित तोडणकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र, विजयी ट्रॉफी आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
विजेत्या संघाचे जळगाव जिल्हा आट्यापाट्या संघटनेचे अध्यक्ष आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार लता सोनवणे, जिल्हा संघटनेचे सचिव डॉ. प्रदीप तळवेलकर, कार्याध्यक्ष नगरसेविका डॉ. अमृता सोनवणे, जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे, प्रशांत जगताप, नगरसेवक डॉ. गौरव सोनवणे, डॉ. शंतनू भारद्वाज, राज्य कार्यकारणी सदस्य अनिल माकडे, शिवछत्रपती पुरस्कारार्थी विशाल फिरके आणि विजय न्हावी यांनी अभिनंदन केले.
विजेत्या संघात कर्णधार भावेश सोनवणे, महेश पाटील, साहिल बिडकर, साई वाणी, आतिश पाटील, ओम गायकवाड, निखिल पाटील, ओम गोपाळ, भावेश चौधरी, तन्मय डोळे, अनमोल तेलंग, सोहेल तडवी, कुंदन बाविस्कर, साकेत खाटीक आणि भावेश जैन यांचा समावेश होता. संघ व्यवस्थापक अँड. अक्षय टेमकर आणि प्रशिक्षक रोहित नवले होते.
Leave a Reply