थंडीचा काळ सुरू झाला की अनेकांच्या घरात किंवा घराच्या आसपास साप दिसू लागतात. थंड वातावरणात साप उबदार आणि अंधारी जागा शोधतात, त्यामुळे घराच्या कोपऱ्यांमध्ये, साठवलेल्या सामानामागे किंवा अंगणातील ढिगाऱ्यांमध्ये ते लपून बसतात. अशा वेळी घाबरून जाण्याऐवजी काही सोपी खबरदारी घेतली, तर सापांपासून स्वतःचा आणि कुटुंबाचा बचाव करता येतो.
घराभोवतीची स्वच्छता आणि भेगा बंद करणे
अंगण, बाग किंवा बाल्कनीमध्ये सुकलेली पाने, लाकडाचे ढीग, विटा आणि भंगार जमा होऊ देऊ नका. अशा अंधाऱ्या जागांमध्ये साप लपण्याची शक्यता असते. घरातील भेगा आणि छिद्रेही वेळीच बंद करा. दरवाजांच्या खालच्या फटी, खिडक्यांमधील मोकळ्या जागा आणि भिंतींमधील भेगा व्यवस्थित बंद करा. खिडक्यांना जाळ्या लावल्या, तर साप घरात शिरू शकणार नाहीत.
उंदीर नियंत्रण आणि साप दिसल्यास काय करावे
उंदीर आणि इतर छोटे जीव हे सापांचे खाद्य असतात. त्यामुळे घरात उंदरांचा वावर होणार नाही याची काळजी घ्या आणि अन्नपदार्थ व्यवस्थित झाकून ठेवा. बाहेर ठेवलेले बूट, हेल्मेट, कपडे किंवा जुने बॉक्स वापरण्यापूर्वी तपासून घ्या. विशेषतः बूट घालण्याआधी ते हलवून पाहा, कारण साप त्यामध्ये लपलेले असू शकतात. घराच्या कोपऱ्यांमध्ये, जिन्याखाली किंवा स्टोअर रूममध्ये जुने सामान आणि भंगार साठवू नका. केवळ नीम तेल, फिनाइल किंवा रॉकेलच्या वासावर साप दूर राहतील असा विश्वास ठेवू नका. घरात साप दिसल्यास त्याला मारण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न करू नका. सुरक्षित अंतर ठेवा, मुलांना आणि पाळीव प्राण्यांना दूर करा आणि स्थानिक वन विभाग किंवा प्रशिक्षित सर्पमित्रांना त्वरित संपर्क करा.
Leave a Reply