भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाने सामना जिंकत मालिका ३-१ ने आपल्या नावे केली. या विजयानंतर संघातील सर्व खेळाडू आनंदी होते.
मात्र ज्याच्यासाठी ही मालिका अतिशय खराब गेली, तो रोहित शर्मा मात्र निराश होता. विजयानंतर बीसीसीआयचे राजीव शुक्ला मैदानात रोहित शर्माशी बोलताना दिसले. त्यावेळी रोहितचा चेहरा पडलेला दिसत होता.
चाहत्यांच्या घोषणांमध्ये संवाद
त्यावेळी चाहते घोषणाबाजी करत होते. राजीव शुक्ला यांच्याशी झालेल्या या संवादानंतर रोहित शर्मा निराश दिसल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येते.
व्हिडिओ व्हायरल
या क्षणाचा व्हिडिओ आता सर्वत्र व्हायरल होत आहे. मालिकेत रोहित शर्माची कामगिरी खराब राहिल्याने त्याच्या निराशेवर चर्चा होत आहे.
Leave a Reply