आगामी २०२७ च्या सुरुवातीला होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच राजकीय वातावरण तापू लागले आहे. राज्यातील ११७ विधानसभा मतदारसंघांतील मतदारांचा कल जाणून घेणारा ताजा सर्व्हे समोर आला आहे.
सत्ताधारी पक्षासमोर सत्ता टिकवण्याचे आव्हान
एकीकडे सत्ताधारी आम आदमी पार्टीसमोर सत्ता टिकवण्याचे आव्हान आहे. आज निवडणूक घेतल्यास भगवंत मान पुन्हा मुसंडी मारणार का, असा प्रश्न या सर्व्हेच्या निमित्ताने चर्चेत आला आहे.
विरोधकांची मोर्चेबांधणी
दुसरीकडे काँग्रेसने सत्तावापसीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यासोबतच भारतीय जनता पार्टी आणि शिरोमणी अकाली दल यांच्यातील संभाव्य युतीच्या चर्चेमुळे निवडणूक रंगतदार बनली आहे. आगामी निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply