हिंदू धर्मात कुलदेवता म्हणजे कुटुंबाची किंवा कुळाची रक्षणकर्ती देवता, अशी श्रद्धा आहे. प्रत्येक कुटुंबात पिढ्यान्पिढ्या कुलदेवतेची उपासना केली जाते. कोणतेही शुभ कार्य असो, पूजाअर्चा असो किंवा नवस असो, अशा प्रसंगी नारळ अर्पण करण्याची परंपरा आहे.
कुलदेवता म्हणजे कुटुंबाचे रक्षणकवच
कुलदेवता ही आपले रक्षणकवच असल्याचे मानले जाते. त्यामुळे विशेषतः कुलदेवतेच्या दर्शनाला गेल्यानंतर नारळ अर्पण केला जातो. अनेक घरांमध्ये आजही वर्षातून किमान एकदा कुलदेवतेच्या दर्शनाला जाण्याची परंपरा जपली जाते.
नारळ अर्पण करण्यामागील श्रद्धा
धार्मिक मान्यता आणि लोकपरंपरेनुसार नारळ अर्पण करणे हे कुलदेवतेप्रती कृतज्ञता आणि श्रद्धा व्यक्त करण्याचे प्रतीक मानले जाते. वर्षानुवर्षे चालत आलेली ही परंपरा आजही अनेक कुटुंबांत तितक्याच श्रद्धेने पाळली जाते, आणि तिच्यामागील महत्त्व जाणून घेतल्यावर अनेकांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.
Leave a Reply