बुलढाणा जिल्ह्यातील मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६ वर खामगावजवळ भीषण अपघात झाला असून, तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीची ट्रकला धडक बसल्याने हा अपघात झाला. त्यात दुचाकीवरील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
## शेगावहून परतताना अपघात
मृत तरुण शेगावहून दर्शन घेऊन परतत होते, अशी प्राथमिक माहिती आहे. परतीच्या प्रवासात त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
## रविवारी अपघातांची मालिका
रविवारचा दिवस अपघातवार ठरल्याचे दिसून आले. सकाळी नांदेड जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. तर, बेळगावमध्ये एकाच कुटुंबातील तिघांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात ही दुर्घटना घडली.
Leave a Reply