भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू रिंकू सिंह लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. तो उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांच्याशी विवाह करणार आहे. या दोघांचा जून २०२५ मध्ये साखरपुडा झाला होता. त्यांचा विवाहसोहळा ४ डिसेंबर रोजी लखनौमध्ये पार पडणार आहे.
पंतप्रधान मोदींना लग्नाचे निमंत्रण
विवाहसोहळ्यासाठी रिंकूने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. रविवारी १५ नोव्हेंबर रोजी तो कुटुंबीयांसह नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचला आणि त्यांना लग्नाचे आमंत्रण व पत्रिका दिली. या भेटीचे खास फोटो सध्या समोर आले आहेत.
लग्नाला पंतप्रधान मोदी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तसेच भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू आणि अनेक सेलिब्रिटी पाहुणेही या सोहळ्याला हजेरी लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
४ डिसेंबरला लखनौमध्ये विवाहसोहळा
रिंकू आणि प्रियाचा विवाहसोहळा लखनौमध्ये पार पडणार असून, त्यासाठीची लगीनघाई सुरू झाली आहे. दोघांच्या विवाहाची चर्चा सध्या क्रिकेट आणि राजकीय वर्तुळातही रंगली आहे.
Leave a Reply