सोमवार, १६ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

विटांनी भरलेला ट्रक गोई नदीत कोसळला; चालक गंभीर जखमी

टायर फुटल्याने नियंत्रण सुटलेला विटांनी भरलेला ट्रक देशमाने येथे गोई नदीच्या पुलाचे कठडे तोडून नदीत कोसळला. चालक गंभीर जखमी झाला असून ग्रामस्थांनी त्याला बाहेर काढले.

विटांनी भरलेला ट्रक गोई नदीत कोसळला; चालक गंभीर जखमी

विंचूर-येवला मार्गावर विटांनी भरलेला भरधाव ट्रक पुलाचे लोखंडी कठडे तोडून थेट देशमाने येथे गोई नदीत कोसळल्याची घटना शनिवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. अपघातात ट्रकचा पूर्ण चक्काचूर झाला असून, चालक गंभीर जखमी झाला आहे.

टायर फुटल्याने नियंत्रण सुटले

नाशिक-संभाजीनगर मार्गावर विटांनी भरलेला ट्रक मालेगावकडे जात असताना देशमाने गावाजवळील गोई नदीच्या पुलावर पोहोचताच अचानक ट्रकचा टायर फुटला. ट्रकचा वेग अधिक असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि काही क्षणांतच ट्रक पुलाचे लोखंडी कठडे तोडून नदीत कोसळला. ट्रकच्या मागून येणाऱ्या वाहनचालकांनीही ट्रकचा वेग भरधाव असल्याचे सांगितले.

अपघातात ट्रकचा पुढील भाग पूर्णपणे दाबला गेल्याने चालक आत अडकला होता. त्याला बाहेर काढणे कठीण होते. ट्रक नदीत कोसळल्याचा आवाज ऐकताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तालुका पोलिसांनीही तातडीने मदतकार्य सुरू केले.

पावणेदोन तासांचे बचावकार्य

ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे आणि जेसीबी व क्रेनच्या साहाय्याने पावणेदोन तासांच्या प्रयत्नांनंतर चालकाला बाहेर काढण्यात यश आले. गंभीर जखमी अवस्थेत त्याला येवला येथे हलविण्यात आले आहे. चालक कमालपुरा, तालुका मालेगाव येथील रहिवासी असून ट्रकचा क्रमांक एमएच ०६ के ८२२२ असा आहे.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance