जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगर परिसरात रविवारी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. क्रांतिकारी लहुजी वस्ताद साळवे आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त धर्म जागरण संस्था आणि निरामय सेवा फाऊंडेशन यांनी संयुक्तपणे हे शिबिर भरवले होते. हनुमान मंदिर परिसरात झालेल्या या शिबिरात २८७ रुग्णांनी विविध आरोग्य तपासण्यांचा लाभ घेतला.
आजारांचे वेळीच निदान हाच उद्देश
सामान्य नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी, आजारांचे वेळीच निदान होऊन उपचार घेता यावेत, हा या शिबिरामागील उद्देश होता. शिबिरात नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.
महापालिकेचे सहकार्य, मान्यवरांची उपस्थिती
शिबिराला आमदार सुरेश भोळे, अजित राणे, डॉ. स्वप्निल सोनवणे, डॉ. अंजली पाटील, डॉ. नेहा चौधरी, डॉ. लतीफ कोल्हे, तुषार पाटील, मनोज जंजाळ, पिंटू बारी, यशवंत कपडे, चंद्रकांत तायडे आणि बेबा सूर्यवंशी उपस्थित होते. जळगाव महापालिकेच्या आरोग्य विभागाने या उपक्रमाला सहकार्य केले. महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ यांनीही या कामात मदत केली.
Leave a Reply