रत्नागिरी जिल्ह्यातील श्री मार्लेश्वर परिसरात डोंगरावरील दगड कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत चार वर्षीय चिमुकली ठार झाली असून दोघे जखमी झाले आहेत. मार्लेश्वर मंदिराजवळच्या परिसरात ही घटना घडल्याची माहिती आहे.
अमरावतीत शेतकऱ्याची आत्महत्या
दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सावंगा गुरव येथे एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. संदीप अवधूत करडे (वय ४५) यांनी विहिरीत उडी घेऊन आपले आयुष्य संपवले. मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती आहे. त्यांच्याकडे एक हेक्टर शेती असून त्यांच्यावर मायक्रो फायनान्सचे दीड लाख रुपयांचे कर्ज होते, अशी माहिती मिळाली आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply