जगातील आघाडीची तंत्रज्ञान कंपनी एनव्हिडियाचे सह-संस्थापक जेन्सन हुआंग यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी कंपनीच्या मुख्य वित्तीय अधिकारी कोलेट क्रेस यांची अंतरिम सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती तात्पुरती असून कायमस्वरूपी सीईओची निवड होईपर्यंत क्रेस या पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.
कोलेट क्रेस कोण आहेत?
कोलेट क्रेस गेल्या १३ वर्षांपासून एनव्हिडियाशी जोडल्या आहेत. त्या सप्टेंबर २०१३ पासून कंपनीत कार्यरत असून सध्या मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. गेमिंगवर लक्ष केंद्रित करणाऱ्या कंपनीचे रूपांतर कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील बलाढ्य कंपनीत करण्याच्या प्रवासात क्रेस यांचे मोठे योगदान असल्याचे सांगितले जाते. एनव्हिडियापूर्वी त्यांनी सिस्को, मायक्रोसॉफ्ट आणि टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स या मोठ्या कंपन्यांमध्ये काम केले असून तेथे त्यांना वरिष्ठ पदांचा आणि नेतृत्वाचा मोठा अनुभव मिळाला आहे.
एनव्हिडिया मंडळाचे नव्याने नियुक्त अध्यक्ष हार्वे जोन्स यांनी क्रेस यांच्या नियुक्तीचे स्वागत करताना सांगितले की, क्रेस यांनी कंपनीच्या महत्त्वाच्या काळात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांना कंपनीच्या व्यवसायाची आणि ग्राहकांची चांगली जाण असल्याचेही त्यांनी नमूद केले. अंतरिम सीईओ म्हणून काम पाहताना क्रेस मुख्य वित्तीय अधिकारी म्हणूनही आपले पद कायम ठेवणार आहेत.
राजीनाम्यामागील पार्श्वभूमी
गेल्या काही दिवसांत हुआंग यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत दोन प्रकरणांची चर्चा सुरू होती. अॅलेस हुआंग या महिलेसोबत तसेच कंपनीच्या आरोग्य विभागाच्या प्रमुख किम्बर्ली पॉवेल यांच्यासोबत त्यांचे विवाहबाह्य संबंध असल्याची चर्चा आहे. अॅलेस हुआंग यांच्यासोबतचे संबंध असल्याचे हुआंग यांनी मान्य केल्याचेही म्हटले जाते. अॅलेस हुआंग या चीनसाठी हेरगिरी करणाऱ्या असल्याचीही चर्चा आहे. कंपनीच्या प्रमुखाने कर्मचाऱ्यांसोबत कोणतेही खाजगी संबंध ठेवू नयेत, असे कंपनीचे नियम असल्याचे सांगितले जाते. या नियमांना तडा गेल्याचा फटका हुआंग यांच्या पदाला बसला आणि अखेर त्यांना पदावरून पायउतार व्हावे लागले.
या वादाचा परिणाम कंपनीच्या शेअरवरही दिसून आला असून शेअर खाली येऊ लागले आहेत. कालपर्यंत जगातील पहिल्या दहा श्रीमंत व्यक्तींच्या यादीत असणारे हुआंग आर्थिक नुकसानीमुळे त्या यादीतून बाहेर पडल्याचेही सांगितले जात आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply