भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील चौथा सामना शुक्रवारी, १३ नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. बे ओवल, माउंट माउंगानुई या मैदानावर होणाऱ्या या सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी साडेसात वाजता सुरुवात होईल. सकाळी सात वाजता नाणेफेक होईल.
मालिकेत भारताने आतापर्यंत दोन सामने जिंकले आहेत, तर तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला. न्यूझीलंडला अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही. तरीही मालिकेतील चुरस कायम आहे. भारताने अद्याप मालिका जिंकलेली नाही आणि न्यूझीलंडनेही मालिका गमावलेली नाही. त्यामुळे चौथा सामना मालिकेच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहे.
भारतासमोर मालिका जिंकण्याची संधी
चौथा सामना जिंकला, तर भारत मालिका आपल्या नावावर करेल. दुसरीकडे न्यूझीलंडसमोर उरलेले दोन्ही सामने जिंकून भारताला मालिका विजयापासून रोखण्याची संधी आहे. त्यामुळे यजमान संघासाठी हा सामना शेवटची संधी ठरणार आहे.
या सामन्यात मिचेल सँटनर न्यूझीलंडचे नेतृत्व करेल, तर श्रेयस अय्यर भारताचा कर्णधार असेल. नियमित कर्णधार शुभमन गिल कसोटी मालिकेची तयारी करणार असल्याने शेवटच्या दोन सामन्यांसाठी नेतृत्वाची जबाबदारी श्रेयसकडे सोपवण्यात आली आहे. कर्णधार म्हणून श्रेयस भारताला मालिका जिंकून देऊ शकेल का, याकडे लक्ष लागले आहे.
बे ओवलवर भारताची सरशी
बे ओवल मैदानावर भारताची न्यूझीलंडविरुद्धची कामगिरी चांगली राहिली आहे. या मैदानावर उभय संघांत आतापर्यंत तीन एकदिवसीय सामने झाले असून भारताने त्यापैकी दोन जिंकले आहेत, तर न्यूझीलंडला एकाच विजय मिळवता आला आहे.
२६ जानेवारी २०१९ रोजी या मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ९० धावांनी पराभव केला होता. त्यानंतर त्याच मालिकेतील पुढील सामन्यात भारताने न्यूझीलंडवर सात विकेट्सनी विजय मिळवला होता. एका वर्षानंतर, ११ फेब्रुवारी २०२० रोजी झालेल्या सामन्यात यजमान न्यूझीलंडने भारताला पाच विकेट्सनी हरवून विजयाचे खाते उघडले होते. त्यामुळे आता या मैदानावर होणारा चौथा सामना कोण जिंकणार, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply