वाडिवऱ्हे परिसरात गुरुवारी दोन वेगवेगळ्या अपघातांत आठ जण जखमी झाले. पहिला अपघात सांजेगाव रस्त्यावर सकाळी साडेनऊच्या सुमारास झाला, तर दुसरा अपघात पाडळी देशमुखजवळ महामार्गावर साडेअकराच्या सुमारास घडला. दोन्ही अपघातांतील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दुचाकी घसरून तिघे जखमी
वाडिवऱ्हेकडे येणाऱ्या दुचाकीचे वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी रस्त्यावर घसरून पडली. या अपघातात दुचाकीवरील तिघांना हातापायाला आणि डोक्याला मार लागला. जखमींमध्ये समीर दिनकर डगळे (१७), चैतन्य सीताराम पोटकुले (१९) आणि गोटीराम रामदास बोराडे (२०, रा. सांजेगाव, ता. इगतपुरी) यांचा समावेश आहे.
अपघाताची माहिती मिळताच नरेंद्राचार्य महाराज आश्रमाच्या मोफत रुग्णवाहिकेचे चालक निवृत्ती पाटील गुंड घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
कार पलटी होऊन पाच जण जखमी
दुसरा अपघात महामार्गावर पाडळी देशमुख येथे विठ्ठल कामत ढाब्याजवळ झाला. मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या कारचे (एमएच ४७, ए ६२८७) चालकाचे नियंत्रण सुटले. कार दुभाजकाला धडकली आणि तिने दोन पलटी घेतल्या. या अपघातात संदीप बंडू कुंभारकर (३२), श्रीनाथ मानसिंग खवळे (३०), आकाश रामदास माळी (२९), अक्षय दशरथ साळुंखे (२८) आणि शुभम वसंत वानखेडे (३०, रा. गंगापूर रोड, नाशिक) हे पाच जण जखमी झाले. त्यांच्या डोक्यासह हातापायाला मार लागला आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply