निफाड डॉक्टर असोसिएशनतर्फे धन्वंतरी पुरस्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात झाला. यंदाचा मानाचा धन्वंतरी पुरस्कार डॉ. ऋषिकेश दौंड व डॉ. सौ. सारिका दौंड यांना प्रदान करण्यात आला.
धन्वंतरी स्तवन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ डॉक्टर डॉ. दिलीप तासकर होते. डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अरुण कातकाडे यांनी प्रास्ताविकातून पुरस्कार सोहळ्यामागील भूमिका व उद्देश स्पष्ट केला. असोसिएशनच्या उपाध्यक्षा डॉ. सौ. सविता तातेड यांनी सूत्रसंचालन केले.
मान्यवरांच्या हस्ते सन्मान
व्यासपीठावर डॉ. उत्तमराव डेर्ले, डॉ. संजीव हाडपे, डॉ. जी. बी. वैष्णव, डॉ. किरण राठी व डॉ. नारायण लोखंडे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते डॉ. ऋषिकेश दौंड व डॉ. सौ. सारिका दौंड यांना धन्वंतरीची मूर्ती व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. सन्मानपत्राची निर्मिती डॉक्टर असोसिएशनचे सरचिटणीस डॉ. सुनील कापसे यांनी केली.
डॉ. महेंद्र कुलकर्णी, डॉ. सुहास घुगे, डॉ. विलास नाठे, डॉ. जितेंद्र वडघुले, डॉ. सुदर्शन पवार व डॉ. रोहिदास गव्हाणे यांनी मनोगत व्यक्त करून पुरस्कारप्राप्त डॉक्टरांचे अभिनंदन केले.
डॉक्टर, केमिस्ट व पॅथॉलॉजी क्षेत्रातील उपस्थिती
कार्यक्रमास डॉ. अमोल घुगे, डॉ. नीलेश डेर्ले, डॉ. नितीन धारराव, डॉ. रुपेश वाघ, डॉ. प्रशांत धुमणे, डॉ. सुदर्शन पवार, डॉ. भूषण राठी, डॉ. रोहित धोक्रेट, डॉ. सचिन ढेमसे, डॉ. राम सानप, डॉ. अमोल पवार, डॉ. शांताराम पानगव्हाणे, डॉ. रामेश्वर गोरडे, डॉ. सुश्रुत निफाडकर, डॉ. भाऊसाहेब काळे, डॉ. भूषण सानप यांच्यासह अनेक डॉक्टर उपस्थित होते.
केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष कडलग, मनोज उगले, संतोष क्षीरसागर, विनोद बनकर, सोमनाथ निकम, जीवन वाघ तसेच पॅथॉलॉजी संघटनेचे रोहिदास गव्हाणे, प्रतीक बाफना, हरीश पवार व गणेश पवार आदी उपस्थित होते. डॉ. योगेश क्षीरसागर व डॉ. विपुल नाबारिया यांनी आभार मानले. डॉक्टर, केमिस्ट व पॅथॉलॉजी क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील सामाजिक बांधिलकी, सेवाभाव व परस्पर स्नेहाचे दर्शन घडले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply