देशातील आघाडीच्या दूरसंचार कंपनीने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी ‘एक घेतला तर एक मोफत’ अशी खास सवलत पुन्हा सुरू केली आहे. या सवलतीत पात्र ग्राहकांना एका रिचार्जच्या किमतीत त्याच मूल्याचा दुसरा रिचार्ज पूर्णपणे मोफत मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांच्या प्लॅनची मुदत थेट दुप्पट होणार आहे.
कोणत्या प्लॅनवर ही सवलत मिळेल?
२८ दिवसांच्या मुदतीच्या दोन लोकप्रिय प्लॅनवर ही सवलत उपलब्ध आहे. २९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज १.५ जीबी हाय-स्पीड डेटा, देशभरात अमर्यादित कॉलिंग आणि दररोज १०० मोफत संदेश मिळतात. ३४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि १०० संदेश मिळतात. पात्र ग्राहकांना ट्रू ५जी नेटवर्कवर अमर्यादित ५जी डेटाचाही लाभ मिळतो.
ही सवलत कोणाला मिळणार?
ही सवलत सर्व ग्राहकांसाठी नाही. ती केवळ निमंत्रणावर आधारित असून ठरावीक पात्र ग्राहकांनाच लागू आहे. गेल्या काही महिन्यांपासून ज्या क्रमांकावर कोणताही रिचार्ज झालेला नाही किंवा ज्यांचे सिम निष्क्रिय होण्याच्या मार्गावर आहे, अशा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ही रणनीती आखल्याचं सांगितलं जातं.
आपला क्रमांक पात्र आहे की नाही, हे तपासण्यासाठी कंपनीकडून अधिकृत संदेश पाठवले जात आहेत. ग्राहक थेट अधिकृत अॅपवर लॉगिन करूनही पात्रता तपासू शकतात. अॅपच्या मुख्य पृष्ठावर ‘फ्री रिचार्ज ऑफर’चा बॅनर किंवा रिचार्ज विभागात २९९ आणि ३४९ रुपयांच्या प्लॅनवर ‘बाय वन गेट वन फ्री’चा सोनेरी बॅज दिसल्यास संबंधित ग्राहक पात्र मानला जातो.
मोफत रिचार्ज कसा मिळेल?
पात्र ग्राहकाने २९९ किंवा ३४९ रुपयांचा रिचार्ज पूर्ण केल्यानंतर मोफत दुसरा प्लॅन मिळण्याची प्रक्रिया सुरू होते. रिचार्ज यशस्वी झाल्यावर पुढील सात दिवसांत मोफत प्लॅन ग्राहकाच्या अॅपमधील ‘मेनू > व्हाउचर’ विभागात जमा केला जातो. हा मोफत प्लॅन ग्राहकांना स्वतः सक्रिय करण्याची गरज नाही. सध्या सुरू असलेला २८ दिवसांचा मूळ प्लॅन संपल्यानंतर हा व्हाउचर आपोआप सक्रिय होतो. त्यामुळे ग्राहकांना २८ दिवसांच्या रिचार्जच्या पैशांत एकूण ५६ दिवसांची अखंड सेवा मिळणार आहे.
ग्राहकांनी कोणत्याही बनावट किंवा संशयास्पद दुव्यावर क्लिक न करता केवळ अधिकृत अॅप किंवा अधिकृत संकेतस्थळावरूनच रिचार्ज करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply