मंगळवार, १० नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

दिंडोरीत दुष्काळग्रस्त पिकांचे पंचनामे अंतिम टप्प्यात

दिंडोरी तालुक्यात पावसाअभावी खरीप हंगाम करपला आहे. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे आता अंतिम टप्प्यात असून अहवाल येत्या आठवड्यात सरकारकडे सादर केला जाणार आहे.

दिंडोरीत दुष्काळग्रस्त पिकांचे पंचनामे अंतिम टप्प्यात

पावसाअभावी दिंडोरी तालुक्यात खरीप हंगाम करपला आहे. शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे. या परिस्थितीतून बळीराजाला बाहेर काढण्यासाठी सरकारच्या आदेशानुसार तालुक्यात नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यात येत आहेत. येत्या आठवड्यात पंचनाम्यांचा अहवाल सरकारकडे सादर केला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पावसाने दडी मारल्याने यंदा जिल्ह्यातील १३ तालुक्यांत सरकारने यापूर्वीच दुष्काळ जाहीर केला होता. त्यानुसार यंत्रणांनी संबंधित तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण करत सरकारला अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार तीन हजार ३०६ गावांतील सहा लाख ४४ हजार २८९ हेक्टरला फटका बसला आहे. त्यामुळे पाच लाख ५७ हजार ७०१ शेतकरी बाधित झाले आहेत. या शेतकऱ्यांना भरपाई म्हणून ६५८ कोटी ६० लाख ३६ हजारांच्या अनुदानाची मागणी प्रशासनाने राज्यस्तरावर केली.

दिवाळीसाठी पाच हजारांची अग्रिम मदत

राज्य सरकारने दिवाळी सणासाठी तातडीची म्हणून पाच हजारांची अग्रिम मदत शेतकऱ्यांना दिली आहे. यादरम्यान सरकारने दुष्काळी तालुक्यांच्या तिसऱ्या यादीत दिंडोरीचा समावेश केला. तालुक्यातील प्रमुख पाच पिकांचे २० टक्के क्षेत्रावरील पंचनामे करण्याचे आदेशही दिले होते.

बाधित शेतकऱ्यांना मदतीचा मार्ग

महसूल व कृषी विभाग संयुक्तरीत्या बांधावर जाऊन पंचनामे करत आहे. हे पंचनामे अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत. लवकरच त्याचा अहवाल राज्यस्तरावर सादर केला जाईल. त्यामुळे जिल्ह्यातील इतर १३ तालुक्यांच्या बरोबरीने दिंडोरीतील बाधित शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळण्याचा मार्ग होणार आहे.

स्रोत: मूळ बातमी

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance