पश्चिम आशियात सध्या मोठी अस्थिरता आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध अद्याप थांबलेले नाही. हे युद्ध संपावे यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. या संघर्षात हुती बंडखोर इराणच्या बाजूने उभे आहेत आणि त्यांनी सौदी अरेबियावर अनेक हल्ले केले आहेत.
या हल्ल्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्रांमध्ये चीनमध्ये तयार झालेले सुटे भाग आढळून आले आहेत. ही माहिती समोर येताच संपूर्ण पश्चिम आखातात खळबळ उडाली आहे. याआधी सौदी अरेबियाने चिनी क्षेपणास्त्रांचा वापर केला होता, असा अहवालही समोर आला होता.
चीनची भूमिका चर्चेत
इराणच्या युद्धात भारताने नेहमीच शांततेचा पुरस्कार केला आहे. मात्र चीनची भूमिका पहिल्यापासूनच संदिग्ध राहिली आहे. आता हुती बंडखोरांना चीनकडून पाठिंबा दिला जात असल्याचा दावा केला जात आहे.
पीएमएल डेली या वृत्तसंस्थेनुसार, चीन हा सौदी अरेबियाचा महत्त्वाचा भागीदार आहे. चीनकडून सौदी अरेबियातील तेल मोठ्या प्रमाणात खरेदी केले जाते. दोन्ही देशांनी आपापले हितसंबंध जपले आहेत. असे असताना सौदी अरेबियाच्या शत्रूने वापरलेल्या क्षेपणास्त्रात चिनी सुटे भाग सापडल्याने पुढे काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सौदी-चीन संबंधांवर प्रश्नचिन्ह
सौदी अरेबिया आणि येमेनमधील हुती बंडखोरांमधील संघर्ष आता फक्त दोन देशांपुरता मर्यादित राहिलेला नाही. त्यात भू-राजकीय स्पर्धा आणि आधुनिक शस्त्रांचा वापर यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंता व्यक्त होत आहे. चीन जर हुतींना क्षेपणास्त्र निर्मितीसाठी सुटे भाग देत असेल, तर सौदी अरेबिया आणि चीन यांच्यातील दृढ होत असलेल्या संबंधांवर प्रश्नचिन्ह उभे राहू शकते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply