अक्कलकोटचे माजी आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते सिद्धाराम म्हेत्रे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पैशांच्या मुद्द्यावरून त्यांनी मोदींवर थेट टीका केली.
“मोदींचे पैसे आले म्हणून धोतर फाटेपर्यंत शेतकरी बँकेत पळतात. हे पैसे तुमचे आहेत. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत,” असे म्हेत्रे म्हणाले. पुढच्या पिढीसाठी काहीतरी करावे लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
डेटा सेंटर आणि कमिशनवरून आरोप
एआय डेटा सेंटर हा गुजरातने नको म्हटलेला प्रकल्प इकडे आणल्याचा आरोप म्हेत्रे यांनी केला. त्यातून आलेले १५ ते २० टक्के कमिशन खाऊन तेच पैसे निवडणुकीत वाटले जातात आणि लोकही पैसे घेऊन मतदान करतात, असे ते म्हणाले. पाणी नाही म्हणून त्यांच्याकडेच तक्रारी केल्या जातात, असा टोलाही त्यांनी लगावला.
कल्याणशेट्टींवरही टीका
कल्याणशेट्टी यांचे अक्कलकोट तालुक्यातील सर्व निवडून आलेले उमेदवार डुप्लिकेट सर्टिफिकेटवर निवडून आले असून त्यांच्याविरोधात केसेस सुरू असल्याचा आरोप म्हेत्रे यांनी केला. उजनीचे ४० टक्के पाणी बाष्पीभवन होते आणि डेटा सेंटर आल्यावर पाणी आणखी वाया जाणार असल्याचे ते म्हणाले. भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना टोला लगावताना “अरे कोण होतास तू, काय झालास तू,” असे म्हेत्रे म्हणाले. “७० वर्षात असला प्रकार नव्हता कधी. यांना पाणी सोडायचे नाही, यांना फक्त रस्ते करायचे आहेत. रस्ते करायचे कशासाठी तर यांना १५-२० टक्के पाहिजे,” असेही त्यांनी म्हटले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply