हरियाणातील फरिदाबाद येथे एका सॉफ्टवेअर कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर (सीओओ) गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली. पार्किंगच्या जागेवरून झालेल्या वादातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परमजीत धनखड यांच्यावर अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. एकूण चौदा गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, त्यातील नऊ गोळ्या त्यांना लागल्या. या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. सूरजकुंड पोलीस ठाण्याकडून ही माहिती देण्यात आली आहे.
पोलिसांकडून माहिती
सूरजकुंड पोलीस ठाण्याचे एसएचओ प्रल्हाद कुमार यांनी या घटनेबाबत माहिती दिली आहे. पार्किंगच्या जागेवरून झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply