धाराशिव जिल्ह्याची खेळाडू सई सापते हिने ७० व्या राष्ट्रीय शालेय ज्युडो स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. तिच्या या यशामुळे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या राष्ट्रीय स्पर्धेत आरंभ शिंदे यानेही सहभाग नोंदवून जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले.
या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्या हस्ते सई सापते आणि आरंभ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांच्या मेहनतीचे आणि जिद्दीचे कौतुक केले. आगामी स्पर्धांसाठी त्यांनी दोघांनाही शुभेच्छा दिल्या.
जिल्ह्यातील खेळाडू राष्ट्रीय स्तरावर चमकताहेत
जिल्ह्यातील खेळाडू राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत असून, त्यांच्या यशामुळे इतर खेळाडूंनाही प्रेरणा मिळत आहे, असे यावेळी सांगण्यात आले. खेळाडूंनी भविष्यातही अशीच सातत्यपूर्ण कामगिरी करून जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
सत्कार समारंभाला जिल्हा क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे, क्रीडा अधिकारी अक्षय बिरादार, योगेश थोरबोले, गणेश सापते आणि राजेश भवाळ आदी उपस्थित होते. सईच्या सुवर्णपदकामुळे धाराशिव जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply