दिवाळी म्हटली की कंदील, पणत्या, रोषणाई आणि सुंदर आठवणी मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपण्याची लगबग सुरू होते. पण अनेकदा अंधारात फोटो काढताना ते हवे तसे क्लिअर येत नाहीत. जर तुम्हालाही या दिवाळीत महागड्या कॅमेऱ्याशिवाय अगदी साध्या स्मार्टफोननेच एकदम प्रोफेशनल आणि भन्नाट फोटो काढायचे असतील, तर थोडेसे योग्य अँगल आणि सेटिंग्ज बदलून तुम्ही तुमच्या दिवाळीच्या फोटोंमध्ये चार चाँद लावून सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेऊ शकता.
फ्लॅश टाळा, नाईट मोड वापरा
अंधारात किंवा रोषणाईत फोटो काढताना मोबाईलचा फ्लॅश ऑन करू नका. यामुळे फोटोमधील नैसर्गिक चमक आणि दिव्यांचा प्रकाश बिघडू शकतो. तुमच्या फोनमध्ये ‘नाईट मोड’ चे फिचर असेल तर त्याचा नक्की वापर करा. यामुळे कमी प्रकाशातही फोटो खूप क्लिअर आणि ब्राईट येतात. नाईट मोड वापरताना फोन अजिबात हलवू नका, अन्यथा फोटो ब्लर होऊ शकतो.
एक्स्पोजर आणि पोर्ट्रेट मोड
स्क्रीनवर जिथे प्रकाश जास्त असेल तिथे टॅप करून मॅन्युअली एक्स्पोजर थोडे कमी करा. यामुळे दिव्यांचा प्रकाश आणि डिझाइन आणखी उठावदार दिसेल. कंदिलाच, पणत्या किंवा सुंदर रांगोळीचे क्लोज-अप फोटो काढताना पोर्ट्रेट मोड वापरा. यामुळे बॅकग्राउंड ब्लर होऊन मुख्य वस्तू आकर्षित आणि सुंदर दिसेल.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply