दिल्लीतील प्रसिद्ध गफ्फार मार्केटमध्ये मध्यरात्री अचानक भीषण आग भडकली. करोल बाग परिसरातील या गजबजलेल्या बाजारात लागलेल्या आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. दाटीवाटीच्या बाजारात आग वेगाने पसरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
आग विझवण्यासाठी मोठी कसरत
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांना आग विझवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. गर्दीच्या बाजारात आग पसरू नये, यासाठी अग्निशमन दलाकडून प्रयत्न करण्यात आले.
आणखी वाचा ·एम्स नागपूरमध्ये संशोधन वैज्ञानिक पदावर भरती
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply