तरुणांसाठी १०० कौशल्य प्रशिक्षण केंद्रे सुरू होणार आहेत. या योजनेचा शुभारंभ मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते होणार आहे. नामांकित सामाजिक, शैक्षणिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून प्रशिक्षण केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे.
स्थानिक युवकांना स्थानिक रोजगार
स्थानिक संस्था, उद्योग आणि शासन यांच्या समन्वयातून ही केंद्रे उभारली जाणार आहेत. स्थानिक युवकांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासोबतच उद्योगांसाठी कौशल्याधारित मनुष्यबळ तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे.
आणखी वाचा ·ट्रक भाडेदरात ४-१३% वाढ; वाहन विक्रीतही तेजी
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply