महिला व बालकल्याण समिती, नाशिक मार्फत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयांतर्गत बालगृहामध्ये काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालके दाखल केली जातात. बालकांची ओळख पटवून संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील दुसाने यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.
आदिती सुरज रावत (वय ४ वर्षे ५ महिने)

आदिती सुरज रावत या बालिकेला ११ फेब्रुवारी २०२२ रोजी बालकल्याण समिती, नाशिक यांच्या आदेशान्वये व आई गीता सुरज रावत हिच्या अर्जाने आधाराश्रम बालगृह संस्था, नाशिक येथे दाखल करण्यात आले आहे. बालिकेची आई ही सुरज राजू शर्मा उर्फ रावत या इसमासोबत मु. पो. किर्तीगळी, ता. सिन्नर, जि. नाशिक येथे राहत होती. आदितीचे पालनपोषण व काळजी घेण्यास महिला सक्षम नसल्याने तिने बालकल्याण समितीसमोर अर्ज केल्यानुसार संस्थेत दाखल करण्यात आले. बालिकेची आई तीन वर्षांपासून भेटण्यास आली नाही.
सॅम जॉली निळे (वय १० वर्षे २ महिने)

सॅम जॉली निळे हा बालक ओझर पोलीस स्टेशन हद्दीत मुंबई ते आग्रा रोडवर देवी मंदिराजवळ रडताना विनापालक आढळून आला. या बालकाला १३ मार्च २०२५ रोजी बालकल्याण समितीच्या आदेशान्वये आधाराश्रम बालगृह संस्था, नाशिक येथे दाखल करण्यात आले आहे. बालकल्याण समितीच्या ६ मे २०२६ रोजीच्या बदली आदेशान्वये आश्रय संस्कार व पुनर्वसन संस्था संचलित मुलांचे बालगृह, मालेगाव, ता. मालेगाव, जि. नाशिक येथे दाखल केले आहे.
कार्तिक सागर पगारे (वय ७ वर्षे १० महिने)

कार्तिक सागर पगारे या बालिकेला बालकल्याण समिती, नाशिक यांच्या आदेशान्वये आश्रय संस्कार व पुनर्वसन संस्था संचलित मुलांचे बालगृह, मालेगाव, ता. मालेगाव, जि. नाशिक येथे दाखल केले आहे. माहे नोव्हेंबर २०२४ पासून या बालिकेचे पालक, इतर कोणतेही नातेवाईक, वारसदार त्यास भेटण्यासाठी आलेले नाहीत अथवा संपर्क साधलेला नाही.
संपर्क साधण्याचे आवाहन
वरील बालकांच्या भविष्याचा विचार करता त्यांच्या पालकांनी आधाराश्रम, नाशिक येथे ०२५३-२५८०३०९, २९५०३०९, आश्रय संस्कार व पुनर्वसन संस्था संचलित मुलांचे बालगृह, मालेगाव येथे ०२५३-२८०३८३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. अथवा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, नाशिक, समाजकल्याण आवार, नाशिक-पुणे रोड, नासर्डी पुलाजवळ, नाशिक येथे ०२५३-२२३६३६८ / २९९१२९४ / २९९४५१८ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही माहिती प्रसारणाच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत बालकांचा दावा करण्यास कोणी आले नाही, तर संबंधित बालकांना पालक नसल्याचे गृहीत धरून पुढील पुनर्वसनाचा विचार करण्यात येणार असल्याचेही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. दुसाने यांनी कळविले आहे.
Leave a Reply