राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. पक्षाच्या नेत्यांनी अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी आमदारांची बैठक बोलावली आहे. मुंबईतील देवगिरी निवासस्थानी ही महत्त्वाची बैठक सुरू असून तिला २० पेक्षा अधिक आमदार उपस्थित असल्याची माहिती आहे.
आमदारांनी मांडल्या अडचणी
बैठकीदरम्यान आमदारांनी आपल्या अडचणी आणि मनातील भावना वरिष्ठ नेतृत्वासमोर मांडल्या. सत्तेतला पक्ष असूनही कामांचा पत्ता नसल्याची भावना काही आमदारांनी व्यक्त केल्याची चर्चा आहे. वरिष्ठ नेत्यांमधील वादाचा फटका पक्षाला बसत असल्याचीही चर्चा या बैठकीच्या निमित्ताने समोर आली आहे.
पक्षात नाराजीचे सूर
गेल्या दोन तासांपासून सुरू असलेल्या या बैठकीत पक्षातील अंतर्गत मतभेदांवर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादीच्या अंतर्गत राजकारणात नाराजीचे सूर उमटू लागल्याने या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply