मेघालयाच्या राजकारणात एका रात्रीत मोठी उलथापालथ झाली आहे. यूडीपी पक्षाचे ११ आमदार एकाच वेळी फुटले असून, त्यामुळे पक्षाचे विधानसभेतील अस्तित्व जवळपास संपुष्टात आले आहे. पक्षाचे एकूण संख्याबळ १२ होते, जे आता केवळ १ वर आले आहे.
पक्षाध्यक्षांचा मंत्रीपदाचा राजीनामा
पक्षाचे अध्यक्ष तेहबाह लिंगदोह यांनी आपल्या कॅबिनेट मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. आमदारांच्या फुटीमुळे पक्षाला मोठा धक्का बसला असून, एकेकाळी विधानसभेत महत्त्वाची भूमिका बजावणारा पक्ष आता एका आमदारापुरता उरला आहे.
८ आमदार भाजपमध्ये, ३ एनपीपीमध्ये
फुटलेल्या ११ आमदारांपैकी ८ आमदार भाजपमध्ये, तर ३ आमदार एनपीपी पक्षात विलीन झाले आहेत. यामुळे भाजपचे संख्याबळ २ वरून १० पर्यंत वाढले आहे. विधानसभा अध्यक्षांनी या फुटीला कायदेशीर मान्यता दिली असून, एका रात्रीत पक्ष विधानसभेतून गायब झाल्याची ही घटना मेघालयाच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply