जेव्हा एखादा नवीन चित्रपट प्रदर्शित होतो, तेव्हा लोक पहिल्याच दिवशी चित्रपटगृहात तो पाहण्यासाठी उत्सुक असतात. काही लोक सुट्ट्यांमध्ये चित्रपट पाहायला जातात. चित्रपटगृहात चित्रपट पाहण्याचा अनुभव खूप छान असतो. मात्र तुम्ही कधी लक्ष दिले आहे का की जगभरातील अनेक चित्रपटगृहांमधील खुर्च्यांचा रंग लालच का असतो? निळा, हिरवा किंवा काळा का नाही? यामागे विज्ञान आणि रंजक इतिहास दोन्ही आहे.
अंधारात लाल रंगाचे विज्ञान
यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. लाल रंग प्रकाशाच्या संपर्कात आल्यावर नाहीसा होतो असे सांगितले जाते. जेव्हा चित्रपट चालू असतो, तेव्हा सर्व दिवे बंद केले जातात आणि फक्त पडद्यावरचा प्रकाश दिसतो. अशा वेळी अंधारात खुर्चीचा रंग डोळ्यांवर उठून दिसत नाही. जर खुर्चीचा रंग वेगळा ठेवला तर लोकांचे लक्ष विचलित होते. म्हणूनच थिएटरमधील खुर्चीचा रंग लाल असतो, जेणेकरून लोकांचे पूर्ण लक्ष चित्रपटावर टिकून राहावे.
भव्यता आणि राजेशाही परंपरा
याशिवाय आणखी एक कारण म्हणजे लाल रंगामुळे चित्रपटगृह भव्य दिसते. त्यामुळे लोकांमध्ये उत्साहही वाढतो. १८व्या आणि १९व्या शतकात युरोपातील नाट्यगृहे आणि ऑपेरा गृहांमध्ये लाल रंग राजेशाही, संपत्ती आणि प्रतिष्ठेचे प्रतीक होता. पुढे चित्रपटगृहांनीही हीच राजेशाही आणि भव्य परंपरा स्वीकारली. त्यामुळे आजही बहुतांश चित्रपटगृहांमध्ये लाल खुर्च्या पाहायला मिळतात.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply