कोकणचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हापूस आंब्याला यंदा हंगाम सुरू होण्याआधीच विक्रमी दर मिळाला आहे. वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये पोहोचलेल्या हापूस आंब्याच्या पहिल्या पेटीला तब्बल ३६ हजार रुपयांचा दर मिळाला असून, हा दर पाहून अनेकांची भुवया उंचावल्या आहेत.
ऑक्टोबरमध्येच उत्पादन घेण्याचा यशस्वी प्रयोग
देवगडच्या गिर्ये रामेश्वर येथील प्रगतशील बागायतदार मिलेश बांदकर यांनी ऑक्टोबर महिन्यातच हापूस आंब्याचे उत्पादन घेण्याचा नवा प्रयोग यशस्वी केला आहे. संकष्टीच्या मुहूर्तावर काढलेली ही पेटी हंगामाआधीच वाशी मार्केटला पोहोचली आणि तिला विक्रमी किंमत मिळाली.
हंगामापूर्वीच पेटी बाजारात
साधारणपणे हापूसचा हंगाम नंतर सुरू होतो, मात्र यावेळी हंगामापूर्वीच पहिली पेटी बाजारात आल्याने तिच्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. पहिल्याच पेटीला मिळालेला ३६ हजार रुपयांचा दर हा या हंगामातील एक वेगळाच टप्पा ठरला आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply