दिवाळी म्हटली की फराळ आला. दरवर्षी फराळात तीच ठराविक पदार्थं बनवली जातात. यंदा मात्र काहीतरी वेगळं करून पाहायचं असेल, तर बेसन आणि डिंकाचे लाडू हा उत्तम पर्याय ठरू शकतो. तोंडात टाकताच विरघळून जाणारे हे लाडू दिवाळीच्या फराळाची रंगत वाढवतील.
फराळात नवा पदार्थ
सणासुदीच्या दिवसांत घरात पाहुण्यांची वर्दळ असते आणि फराळाचे ताट सगळ्यांच्या आकर्षणाचा विषय ठरतो. अशा वेळी नेहमीच्या पदार्थांसोबत डिंक-बेसन लाडू ठेवले, तर ताटाला एक नवा स्वाद मिळतो. घरच्या घरी तयार होणारा हा पदार्थ दिवाळीच्या आनंदात भर घालतो.
डिंक शरीरासाठी फायदेशीर
डिंक शरीरासाठी खूप फायदेशीर मानला जातो. त्यामुळे हा लाडू केवळ सणापुरता मर्यादित न राहता सकाळच्या नाश्त्यातही खाता येतो. चवीसोबत आरोग्याचीही काळजी घेणारा हा पदार्थ दिवाळीच्या फराळात नक्कीच जागा मिळवण्यास पात्र आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply