शुक्रवार, ३० ऑक्टोबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

कन्यादान योजनेअंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्यासाठी अनुदान

कन्यादान योजनेअंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्यासाठी अनुदान

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील वधू-वरांना विवाहासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने समाज कल्याण विभागामार्फत कन्यादान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या पात्र स्वयंसेवी संस्थांना शासनामार्फत अनुदान देण्यात येते. पात्र संस्थांनी आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त देविदास नांदगांवकर यांनी केले आहे.

या योजनेंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक जोडप्यामागे संबंधित स्वयंसेवी संस्थेला ४ हजार रुपये अनुदान देण्यात येते. तसेच विवाह सोहळ्यातील पात्र जोडप्यांना २५ हजार रुपये अनुदान देण्याची तरतूद आहे.

कन्यादान योजनेचा लाभ घेण्यासाठी वधू व वर महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे. नवदांपत्यातील वधू-वर दोघेही किंवा त्यांपैकी एकजण अनुसूचित जाती, नवबौद्ध अथवा प्रवर्गातील पात्र घटकांतील असावा. वधूचे वय १८ वर्षे आणि वराचे वय २१ वर्षे पूर्ण असणे आवश्यक असून दोघांचेही वय २८ वर्षांपेक्षा कमी असावे. वधू-वरांच्या प्रथम विवाहासाठी या योजनेचा लाभ अनुज्ञेय आहे. तसेच योजनेच्या निकषांनुसार विधवा महिलेस दुसऱ्या लग्नासाठीही लाभ घेता येईल. बालविवाह प्रतिबंधक कायदा किंवा हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत कोणत्याही तरतुदीचा भंग झालेला नसल्याबाबत संबंधितांनी लेखी प्रतिज्ञापत्र (ॲफिडेव्हिट) सादर करणे आवश्यक आहे. जात प्रमाणपत्र सक्षम प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेले असावे.

सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणारी स्वयंसेवी संस्था धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. अर्जासोबत संस्थेच्या नोंदणीसह आवश्यक कागदपत्रे व संबंधित पुरावे सादर करावेत. अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील वधू-वरांचे सामूहिक विवाह सोहळे आयोजित करणाऱ्या संस्थांनी विवाह सोहळा पार पडण्याच्या किमान ३० दिवस आधी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नाशिक कार्यालयाकडे संपर्क साधून प्रस्ताव सादर करावा.

कन्यादान योजनेच्या पात्रता निकषांविषयी, अनुदानाबाबत तसेच अर्ज प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नाशिक कार्यालय, नासर्डी पुलाजवळ, नाशिक क्लबसमोर, नाशिक-पुणे रोड येथे संपर्क साधावा, असेही आवाहन सहाय्यक आयुक्त श्री. नांदगावकर यांनी केले आहे.

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance