मागील आठवड्यात सोन्याच्या किमतीत १२ हजार रुपयांपेक्षा जास्त घसरण नोंदवली गेली होती. मात्र या आठवड्यात सोमवारपासूनच सोन्याच्या दरात वाढ सुरू झाली होती. मागील चार ते पाच दिवसांत सोन्याच्या किमतीत प्रतितोळा तीन ते चार हजार रुपयांची वाढ झाली होती. आठवड्याच्या शेवटी मात्र ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आज सराफा बाजार उघडताच सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण नोंदवली गेली.
आजचे सोन्याचे दर किती?
२४ कॅरेट सोन्याच्या किमतीत प्रतितोळा ५४० रुपयांची घसरण झाली आहे, तर २२ कॅरेट सोने प्रतितोळा ५०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. १८ कॅरेट सोन्याच्या दरातही घसरण झाली आहे. दरांनुसार २४ कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा १ लाख २८ हजार १० रुपयांवर पोहोचला आहे, तर २२ कॅरेट सोन्याची किंमत १ लाख १७ हजार ३५० रुपये झाली आहे. १८ कॅरेट सोने ९६ हजार ४० रुपये प्रतितोळ्यावर आले आहे.
प्रतिग्रॅम दर पाहिल्यास २४ कॅरेट सोन्याची किंमत १२ हजार ८०१ रुपये, २२ कॅरेट सोन्याची किंमत ११ हजार ७३५ रुपये आणि १८ कॅरेट सोन्याची किंमत ९ हजार ६०४ रुपये झाली आहे. मुंबई आणि पुण्यात २४ कॅरेट सोने प्रतिग्रॅम १२ हजार ७८६ रुपये, २२ कॅरेट ११ हजार ७२० रुपये आणि १८ कॅरेट ९ हजार ५८९ रुपये दराने मिळत आहे.
लग्नसराईत खरेदीदारांना दिलासा
दिवाळीनंतर सोन्याच्या दरात अचानक वाढ झाल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र आता लग्नसराई सुरू होताच सोने स्वस्त झाल्याने खरेदीदारांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबई, पुणे, जळगाव, नागपूर आणि कोल्हापूरसह दिल्ली आणि चेन्नईमध्येही सोन्याच्या दरात घसरण नोंदवली गेली आहे. लग्नाच्या खरेदीसाठी सोने घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही घसरण दिलासादायक ठरू शकते.
प्रतिक्रिया व्यक्त करा