हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या मार्गावरील बालेवाडी हायस्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही दोन मेट्रो स्थानके आजपासून प्रवाशांसाठी खुली होत आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आज दुपारी ३.३० पासून सेवा सुरू
दुपारी ३.३० वाजल्यापासून या दोन्ही स्थानकांवरून मेट्रो सेवा सुरू होणार आहे. या दोन स्थानकांमुळे बालेवाडी परिसरातील प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीचा होणार आहे.
मार्गाचे उद्घाटन आणि पहिला टप्पा
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे उद्घाटन ३ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून या मार्गावर मेट्रो वाहतूक सुरू झाली. पहिल्या टप्प्यात २३ पैकी १७ स्थानकांवरून प्रवाशांची वाहतूक सुरू होती. आता आणखी दोन स्थानके खुली झाल्याने या मार्गावरील सेवा आणखी वाढली आहे.
Leave a Reply