भारत आणि न्यूझीलंड यांच्यात नुकतीच पाच सामन्यांची वनडे मालिका पार पडली. ही मालिका ३-१ ने भारताने जिंकली आहे, तर एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. मात्र या मालिकेत सर्वात जास्त लक्ष होते ते विराट कोहली आणि रोहित शर्माच्या कामगिरीकडे. दोघांनी चाहत्यांची निराशा केली, कारण संपूर्ण मालिकेत दोघांची फलंदाजी काहीशी सामान्य राहिली. त्यावरून आता हे दोघे २०२७ चा वनडे वर्ल्डकप खेळणार की नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या बॅटमधून अपेक्षित धावा निघाल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या वर्ल्डकप २०२७ मधील सहभागावरून चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच बीसीसीआयने देखील याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे, त्यामुळे आता चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र बीसीसीआयच्या भूमिकेमुळे ‘रो-को’ च्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.
एका मालिकेवरून भविष्य ठरणार नाही
समोर आलेल्या माहितीनुसार, एका वनडे मालिकेवरून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंचे भविष्य ठरणार नाही. मोठ्या स्पर्धांमधील त्यांचा अनुभव, दडपणाखाली खेळण्याची क्षमता आणि ड्रेसिंग रूममधील त्यांचे स्थान संघासाठी अत्यंत मोलाचे असल्याची भूमिका बीसीसीआयने मांडली आहे.
बीसीसीआय अधिकाऱ्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कधीपर्यंत खेळायचे, याचा अंतिम निर्णय पूर्णपणे या दोन्ही खेळाडूंवरच अवलंबून असेल. भारतीय क्रिकेटचे दोन दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भविष्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता नवे वळण मिळाले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार बीसीसीआयनंतर कर्णधार शुभमन गिलने देखील याबाबत मोठे संकेत दिले आहेत. “जहाँ मैटर बड़े होते हैं, वहाँ लेजेंड्स खड़े होते हैं” असे शुभमन गिलने म्हटले आहे.
पुढील मालिका आणि अधिकृत निर्णयाची प्रतीक्षा
१३ डिसेंबरपासून भारत आणि श्रीलंका यांच्यात वनडे मालिका होणार आहे. मात्र, विराट कोहली आणि रोहित शर्मा २०२७ चा वनडे वर्ल्डकप खेळणार का, याबाबत बीसीसीआय किंवा निवड समितीकडून अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही. त्यामुळे दोन्ही दिग्गजांच्या वर्ल्डकपमधील सहभागाबाबतची चर्चा सध्या तरी सुरूच राहणार आहे.
Leave a Reply