यंदाच्या दुष्काळाचा फटका मिरचीलाही बसला असून उत्पादनात सुमारे ४० टक्क्यांची घट झाली आहे. परिणामी मिरच्यांचे दर किलोमागे २५० ते ३०० रुपयांनी वाढले आहेत. सध्या बाजारात शीतगृहांत साठवणूक केलेला माल आला असून नवीन मिरची १० ते १५ डिसेंबरपासून मुंबईसह राज्यातील सर्व बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
गेल्या वर्षी दर घसरले होते
गेल्या वर्षी मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले होते. त्यामुळे सर्व मिरच्यांचे दर घसरले होते. मात्र यंदा मिरचीचे वाढलेले दर ग्राहकांना चांगलाच ठसका लावतील, अशी चिन्हे आहेत.
विविध जातींच्या मिरच्यांचे दर वाढले
कर्नाटक बॅडगी, तेजा, संकेश्वरी आणि काश्मिरी या जातींच्या मिरच्यांचे दरही वाढले आहेत. दुष्काळामुळे उत्पादन घटल्याने यंदा मिरची महाग झाली आहे.
Leave a Reply