तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री त्रिशा कृष्णन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिच्या चित्रपटांमुळे नव्हे, तर राजकारणातील संभाव्य प्रवेशामुळे तिच्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. अभिनेते आणि राजकारणी विजय यांच्यासोबत तिचे नाव जोडले जात असतानाच, आता त्रिशा लवकरच राजकारणात प्रवेश करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
समर्थकांनी सुरू केला फोरम
सोमवारी, २३ नोव्हेंबर रोजी तिरुनेलवेली येथे काही समर्थकांनी यंग रिव्होल्युशनरी लीडर त्रिशा फोरम नावाची संघटना सुरू केली. या संघटनेची पोस्टर्स सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. त्रिशाच्या राजकीय प्रवेशाबाबत समर्थकांमध्ये उत्साह दिसून येत आहे.
जयललिता यांच्याशी तुलना
त्रिशा यांची तुलना दिवंगत नेत्या जयललिता यांच्याशी केली जात आहे. चित्रपटसृष्टीतून राजकारणात आलेल्या जयललिता यांच्याप्रमाणेच त्रिशा यांचाही राजकीय प्रवास होईल का, अशी चर्चा चाहत्यांमध्ये आणि राजकीय वर्तुळात सुरू आहे. या चर्चांवर त्रिशा यांची प्रतिक्रिया काय असते, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply