सोमवार, २३ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

गुवाहाटीत मला संपवण्याचा कट होता; देशमुखांचा दावा

ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी गुवाहाटीवरून दावा केला. दिल्लीवरून फोन आला होता व हल्ल्याचे कारण सांगून मला संपवण्याचा कट रचल्याचे त्यांनी सांगितले.

गुवाहाटीत मला संपवण्याचा कट होता; देशमुखांचा दावा

शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी बंडखोरीच्या वेळी माघारी परतणाऱ्या एका आमदाराचे ‘राम राम सत्य’ होणार होते, असा दावा केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यांच्या या विधानावर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी गंभीर प्रश्न उपस्थित करत खळबळजनक दावा केला आहे.

देशमुख काय म्हणाले?

“आमचा रामनाम सत्य करणारा कोण? संजय शिरसाट यांनी सांगितलं आहे, तर आमचा रामनाम सत्य का होणार होता? आम्ही पक्षाशी प्रामाणिक राहिलो म्हणून आमचा रामनाम सत्य होणार होता का?” असा सवाल देशमुख यांनी केला.

गुवाहाटीवरून आल्यानंतर शिंदे गटातीलच एका आमदाराने त्यांना सांगितले होते की, दिल्लीवरून फोन आला होता. अटॅक आला असं सांगून मला गेम करण्याचा कट होता. आमचा रामराम तिथेच करायचा होता, असा दावा देशमुख यांनी केला आहे.

“मारनेवाला भगवान, बचाने वाला भगवा. हा माझा पुनर्जन्म आहे. आमचा राम नाम सत्य सुरतमध्ये होणार होता. दिल्लीत कोणाचा नेमका फोन होता, हे माहिती नाही. शिरसाटही म्हणतात राम नाम सत्य होणार होता. आता त्यांनीच स्पष्ट करावं, कोण राम नाम सत्य करणार होते? आता सरकार चौकशी करणार का, एफआयआर दाखल करणार का? आम्ही रस्त्यावर उतरतो, सरकारच्या विरोधात आंदोलन करतो. आमच्या जीवाचं बरेवाईट केलं तर काय करणार? माझं हे आयुष्य शेतकरी आणि ठाकरेंसाठी आहे,” असंही देशमुख म्हणाले.

गुवाहाटीतील हॉटेलमधील प्रसंग

गुवाहाटी प्रकरणावेळी हॉटेलमध्ये माझी आणि शिंदेंची शाब्दिक चर्चा झाली, असा खुलासाही देशमुख यांनी केला. “नितीन, कोणत्याच परिस्थितीत थांबत नाहीयेस, मी तुला खूप सहकार्य केलं,” असं शिंदे म्हणाले, असे त्यांनी सांगितले. त्यावर देशमुख म्हणाले की, तुम्ही पक्षाचे नेते होता म्हणून सहकार्य कराल; पक्षाचे नेते होते, शोषण थोडीच कराल. “तू सगळं खराब करतोयस, माझं मिशन फेल जाईल,” असं शिंदे म्हणाले.

त्यानंतर शिंदे सहज म्हणाले, “पिस्तुल आण, माझ्याच डोक्यात मारून घेतो.” त्यांना देशमुख यांनी सांगितलं, तुम्ही असं करू नका, मीच माझ्या डोक्यात मारून घेतो. त्यानंतर पोलीस आले. त्यांना रुग्णालयात नेलं. दुसऱ्या दिवशी त्यांची चर्चा झाली; ती चर्चा काय होती, ते सांगू शकणार नाही, असं देशमुख यांनी सांगितलं.

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance