आचार्य चाणक्य हे केवळ त्यांच्या ज्ञान आणि बुद्धिमत्तेमुळेच ओळखले जात नव्हते, तर त्यांच्या व्यवहार, स्वभाव आणि प्रेरणा देण्याच्या पद्धतीमुळेही त्यांची ओळख होती. त्यांनी सांगितलेल्या नीतींचा अवलंब करून आज अनेकांनी आपले जीवन सुधारले आहे. मानवी जीवनाच्या अनेक पैलूंवर त्यांनी स्पष्ट मते मांडली आहेत. त्यांच्या चाणक्य नीतीत स्त्रियांच्या अशा काही गुणांचा उल्लेख आहे, जे घरात समृद्धी घेऊन येतात.
हे पाच गुण कोणते?
चाणक्य नीतीनुसार, ज्या स्त्रीमध्ये संयम राखण्याची क्षमता असते, ती अत्यंत कठीण प्रसंगातही खचून जात नाही. उलट दृढनिश्चयाने आव्हानांचा सामना करण्यास ती सज्ज राहते. अशी स्त्री कोणतेही काम घाईत करत नाही आणि घाईघाईने निर्णयही घेत नाही, त्यामुळे घरात सुख आणि शांती नांदते. समजूतदार स्त्री विचार करून निर्णय घेते; तिला योग्य आणि अयोग्य यातला फरक माहीत असतो. कधी काय करायचे आणि कधी काय नाही, हे तिला नीट समजते. ती घरातील सर्व समस्यांपासून दिलासा देते आणि कठीण काळात कुटुंबाला आधार देते.
वाणी, जबाबदारी आणि प्रामाणिकपणा
ज्या स्त्रीची वाणी गोड असते, ती सर्वांची मने जिंकून घेते. ती नम्रतेने बोलते, इतरांच्या मतांचा आदर करते आणि सर्वांशी आदराने वागते. असे गुण घरात आपुलकी आणि प्रेमाचे वातावरण निर्माण करतात. आपली जबाबदारी पूर्ण गांभीर्याने आणि निष्ठेने पार पाडणारी स्त्रीही घरात समृद्धी आणते. ती कुटुंबाकडे, मुलांकडे आणि नातेसंबंधांकडे लक्ष देते आणि आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे बजावते. सत्यवादी आणि प्रामाणिक स्त्री ही घराचा सर्वांत विश्वासार्ह आधारस्तंभ असते. परिस्थिती कशीही असली तरी ती खोटेपणाचा किंवा कपटाचा आश्रय घेत नाही, त्यामुळे संपूर्ण कुटुंबात परस्पर विश्वास निर्माण होतो.
Leave a Reply