मध्य प्रदेशातील नरसिंगपूर जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबातून आलेल्या तपस्या परिहार हिने देशातील सर्वात खडतर मानल्या जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर २३ वा क्रमांक पटकावला आहे. पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतरही तिने हार मानली नाही आणि केवळ स्व-अध्ययनाच्या बळावर आयएएस अधिकारी होण्याचं स्वप्न साकार केलं आहे.
महागडं कोचिंग नाही, सोशल मीडियाचाही त्याग
तपस्याने पुण्यात शिक्षण घेतलं. तिने महागड्या कोचिंग क्लासची मदत घेतली नाही. सोशल मीडियापासून दूर राहून तिने स्वतःच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर तिने हे यश मिळवलं आहे.
छोट्या गावातून मोठं यश
एका छोट्या गावातील शेतकऱ्याच्या मुलीने देशभरात २३ वा क्रमांक मिळवून इतिहास घडवला आहे. तिचं यश अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरलं आहे. स्व-अध्ययन आणि सातत्याने यश मिळवता येतं, हेच तिच्या कहाणीतून दिसून येतं.
Leave a Reply